Tree - Rashi
Sal – Dhanu

Sal – Dhanu

साल हा मोठा आणि पानझडी वृक्ष आहे. साल वृक्षाचे लाकूड अत्यंत कठीण मजबूत आणि टिकाऊ असते. घर बांधणी, पूल बांधणी , खांब, नावा, शेती अवजारे, सजावटीचे साहित्य यासाठी वापर केला जातो. याच्या बियापासून तेल मिळते ते दिवा आणि साबुन उद्योगासाठी वापरले जाते. साल वृक्ष एक पूज्य वृक्ष आहे. आदिवासी समाज या वृक्षास देवीचे घर म्हणून पूजा करतात. कुष्ठरोग जखमा खोकला डोकेदुखी अतिसार यावर उपचारासाठी या झाडाची पाने आणि साल वापरतात. अध्यात्माच्या दृष्टीने हा वृक्ष अतिशय महत्त्वाचा आणि लोकप्रिय आहे.

 

रोपे मिळवण्यासाठी नोंदणी फॉर्म