Tree - Rashi
Peepal – Kark

Peepal – Kark

पिंपळाचे झाड भारतीय उपखंडातील पौराणिक, जीवनाचे झाड किंवा जागतिक वृक्ष मानले जाते. या वृक्षाला बोधी वृक्ष म्हणून ओळखले जाते. पिंपळ हे अंजिराच्या झाडाचे एक रूप आहे. पिंपळ वृक्ष हे मंदिराजवळ पवित्र जागेत लावले जातात. किंवा जंगलामध्ये लावले जातात. निसर्गातून उगवून देखील येतात. पिंपळाच्या झाडाचे फार मोठे औषधी उपयोग आहेत. पिंपळाच्या झाडांमध्ये कर्बोदके प्रथिने चरबी, फायबर, कॅल्शियम, लोखंड, तांबे, मॅंगनीज, जस्त आढळते. पिंपळाचे पौराणिक फार महत्त्व आहे. पिंपळाच्या झाडापासून फार मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वातावरणात सोडला जातो. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पिंपळाच्या झाडाची लागवड होणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती होते. पावसाचे प्रमाण खूप चांगले वाढते म्हणून आपण पिंपळाचे झाड लावण्याचा देखील प्रयत्न करणे आवश्यक आहे.

 

रोपे मिळवण्यासाठी नोंदणी फॉर्म