Tree - Rashi
Palash – Sinh
पळस ही वनस्पती भारतात सर्वत्र आढळणारी आणि आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान असणारी वनस्पती आहे. पळस या वृक्षाला हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. या वृक्षामुळे आपल्या जीवनात सुख समाधान आनंद मिळते. या वृक्षामध्ये अनेक देवतांचा सहवास असतो. पळस दोन प्रकारचे असतात केशरी आणि पांढरा. पळसाच्या पानाचा वापर जेवणासाठी पत्रावळी बनवल्या जातात. पळसाच्या मुळांचा वापर आयुर्वेदामध्ये केला जातो. पळसामध्ये त्रिदेवांचा सहवास असतो, त्यावरूनच पळसाला पाने तीनच असे म्हटले जाते. अतिशय शुभ असणारा हा वृक्ष दृष्टीस पडला तरी शुभ संकेत मिळतात. ब्रह्म विष्णू आणि महेश पळसाच्या पानात सहवास आहे. पळस वृक्षाला देवांचा खजिना असे म्हटले जाते.
रोपे मिळवण्यासाठी नोंदणी फॉर्म
bhagyalaxmiharitkranti
0