Introduction
आपल्या भारत देशाचे पर्यावरण दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. निसर्गचक्र अनियमित होत आहे. पर्यावरण प्रदूषित होत चालले आहे. निसर्ग पर्यावरणावर अन्याय करून शहरीकरण, रस्ते, रेल्वे, औद्योगीकरण होत आहे. जेवढ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे, तेवढ्या प्रमाणात वृक्ष लागवड होत नाही. परिणामी उजाड , बकाल ,शहरे ,मैदानी डोंगर ,पर्वत, नद्या होत आहेत. त्यामुळे नद्या खराब झाल्या. पाणी साठे संपत चालले, पर्यावरणात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले, प्राणी पक्षी यांचे जीवन असाह्य झालेले आहे. मनुष्य प्राण्यास सुद्धा हवा, शुद्ध पाणी, आणि मोकळा श्वास घेणे देखील अशक्य झाले आहे. मानवाच्या थोड्याशा स्वार्थासाठी डोंगर, पर्वत, नद्या, वृक्ष नष्ट केले जात आहेत. मागील अनेक वर्षापासून दिवसेंदिवस तापमान वाढत चालले आहे. 44 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान वाढलेले आहे. काही ठिकाणी मागील अनेक वर्षाचे रेकॉर्ड मोडले आहेत. धरणातील पाण्याची पातळी धोका ओलांडत आहेत. प्राणी पक्षी यांचे जीव जात आहेत, मानवाला देखील हे दिवस फार दूर नाहीत. जर मानवास सुखी , आनंदी, नैसर्गिक जीवन जगायचे असेल तर, निसर्गाची सेवा वृक्ष लागवड करून करता येईल , त्यासाठी आपल्या सर्वांचा पर्यावरण वाचवण्यासाठी हातभार लागणे आवश्यक आहे, त्यासाठी आपण एक कार्यक्रम तयार केलेला आहे. संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करायची त्यातून आपल्या जीवनाची सकारात्मकता मिळवायची आणि सुखी आनंदी जीवन जगायचे तर आपण सर्वजण या भारत देशाच्या हरितक्रांतीमध्ये सहभागी होऊयात, आणि आपले मित्र नातेवाईक, परिवार यांना देखील वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी करून घेऊया आणि आपले पर्यावरण वाचूया.
चला तर आपण सर्वजण वृक्ष लागवड करूया ।
आणि आपले जीवन ,आर्थिक उन्नती, भाग्य घडवूया ।।
Loading...
रोपे मिळवण्यासाठी नोंदणी फॉर्म