Tree - Rashi
Banyan – Sinh

Banyan – Sinh

वडाच्या झाडापासून आपल्याला ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मिळतो. वडाच्या झाडाचा विस्तार फार मोठा असतो. भरपूर प्रमाणात सावली मिळते. वडाचे झाड एकदा लावले की ते आपणास वर्षानुवर्षेस साथ देते. वडाच्या झाडाची वटपौर्णिमेला पूजा केली जाते. देवाक म्हणून पूजन केले जाते. पौराणिक फार महत्त्व आहे. वडाच्या झाडापासून आरोग्य विषयक फार मोठे फायदे होतात. वडाच्या पानाचा उपयोग जेवणासाठी पंतरवाळ्या बनवण्यासाठी केला जातो. वडाची पाने , फुले मुळे, चीक, साल यांचा वापर औषधांमध्ये केला जातो. वडाच्या परंब्याचा वापर केशवर्धक म्हणून वापर केला जातो. वडाचे मोठे झाड हे एक तासाला 712 किलो इतक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन हवेमध्ये सोडते. वडाचा चीक दात दुखी संधिवात तर पायांच्या भेगावर फायदेशीर ठरतो. वडाच्या सालीचा काढा मधुमेहावर रामबाण उपाय आहे. ताप कमी करण्यासाठी वडाच्या पारंब्याचा रस दिला जातो. चेहरा उजळण्यासाठी कानाच्या समस्येवर केसांवर उपाय नाक दात यावर उपाय आहे. अतिसारावर उपाय वड आहे. मूत्रविकारावर वडाच्या मुळीची पावडर चांगला उपाय आहे. डोळ्याची सूज कमी करण्यासाठी अल्सरवर गुणकारी आहे. रक्त स्त्राव कमी करण्यासाठी वडाच्या पारंब्यांचा उपयोग आहे. ज्या गावांमध्ये वडाचे झाड आहे त्या गावचे आरोग्य उत्तम आहे. प्रत्येक किलोमीटर मागे एक वडाचे झाड असलेच पाहिजे, म्हणून आपण सर्वांनी या प्रकारच्या झाडे लावण्याचा देखील प्रयत्न करणे आवश्यक आहे.

 

रोपे मिळवण्यासाठी नोंदणी फॉर्म