Tree - Rashi
Amla – Mesh

Amla – Mesh

आवळा वृक्ष हा फळ देणारा वृक्ष आहे. आवळा हे तुरट आंबट चवीचे हिवाळ्यात येणारी हिरव्या रंगाचे औषधी फळ आहे. आवळ्याला आयुर्वेदामध्ये फार मोठे स्थान आहे. आयुर्वेदात आवळ्याचा वापर त्रिफळा चूर्ण आणि चवनप्राश मध्ये केला जातो. प्राचीन ग्रंथकाराने आवळ्याला शिवा कल्याणकारी वयस्था वाढत्या वयाला थांबून ठेवणारे धात्री आईसारखे रक्षण करणारे म्हटले आहे. आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवण करणे त्या जेवणाला आवळी भोजन म्हणतात, हे फार भाग्याचे असते , आवळा वृक्ष आणि लक्ष्मी यांचा अध्यात्मिक सहसंबंध आहे. आवळा वृक्ष लावणाऱ्यास लक्ष्मी वरदान मिळते. आवळ्याची शेती लागवड फायदेशीर ठरते.आवळा वृक्ष हा आराध्य वृक्ष आहे. सर्वांसाठी फलदायी आहे.

 

रोपे मिळवण्यासाठी नोंदणी फॉर्म